Posts

Showing posts from November, 2022

माणकेश्वर मंदिरावरील कर्पूरमंजिरी

Image
कल नुमाइश में फिर गीत मेरे बिके और मैं क़ीमतें ले के घर आ गया, कल सलीबों पे फिर प्रीत मेरी चढ़ी मेरी आँखों पे स्वर्णिम धुआँ छा गया। नुकतीच ही गजल वाचण्यात आली. कोण्या अनामिकाने हे लिहलेले वाचून मन खिन्न झाले. नुकतेच माणकेश्वर (तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद) येथील माणकेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिर आणि गावाचे नाव एकच असल्याने शोधणे अवघड नाही. (गुगल बाबा आहेतच) अतिशय भव्य असे त्रिदल मंदिर, सुंदर रेखीव काम केलेल्या द्वारशाखा, बाह्यांगावर भग्न सुरसुंदरी यांची रेलचेल, रिकामी देवकोष्ट सारे काही मन उदास करणारे असले तरी, जे शिल्लक आहे; ते नसे तोकडे असे म्हणून गोड करून घ्यायचे ठरविले आणि निघालो एक एक शिल्प पाहत. त्यातील प्रत्येक शिल्पाचे वेगळेपण हळूहळू जाणवायला लागले. केश रचना, अलंकार, मेखला, वस्त्रालंकार, उभे राहण्याची ढब. त्यातील दर्पणा, शुकसारिका, विन्यासा, केतकीभरणा, चामरा, पद्मगंधा, तोरणा, मुग्धा, अलसा असे एक एक शिल्प न्याहाळताना अचानक एके ठिकाणी थबकलो. असे शिल्प पहिले नव्हते, असे नाही. पण यातील सौंदर्य काही वेगळेच भासत होते. ही आहे 'कर्पुरमं...

शिल्पकलेतील त्रिपुरांतक शिव आणि त्रिपुरारी पौर्णिमा

Image
आज कार्तिक स्नान समाप्ती आणि कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा. आजचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. कार्तिक महिन्यातील या पौर्णिमेच्या दिनानिमित्त अनेक पौराणिक संदर्भ आहेत. तसेच बौद्ध आणि शीख धर्मातही आजचा दिवस तसा महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्रिपुर संहारा ची कथा महाभारतामध्ये वाचायला मिळते. तारकासुराची तीन मुले होती. विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष. या तिघांनी ब्रह्मदेवाची आराधना करून तीन अभेद किल्ल्यांचे स्वामित्व प्राप्त करून घेतले होते. यासोबतच असाही वर मिळून घेतला होता की, हे तीनही किल्ले त्यांच्या इच्छेप्रमाणे फिरत असतील. एक हजार वर्षात एकदाच ते एका सरळ रेषेत येतील आणि याच वेळी एकाच बाणाने हे तीन पूर नष्ट केल्या जाऊ शकतील. मयासूर या स्थापतीने सोने, चांदी व लोखंडाचे तीन किल्ले निर्माण करून दिले. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तीन पूर मिळविल्यानंतर हे तिन्ही बांधव बलवान होऊन देवांना छळण्यास प्रारंभ केला. एक हजार वर्षानंतर जेव्हा ही तीनही पूर एकाच बिंदूवर येणार होती, त्यावेळी सर्व देवतांनी देवाधिदेव महादेव यांच्याकडे प्रार्थना केली की, हे ...