Posts

Showing posts from October, 2022

सफर औरंगाबाद लेणीची...

Image
ना होकर भी तुम मौजूद हो मुझमें,  क्या खूब तुम्हारा वजूद है मुझमें। इस तरह हम सुकून को महफूज कर लेते हैं,  जब भी तन्हा होते हैं तुम्हे महसूस कर लेते हैं। औरंगाबाद लेणी  लेणी क्रमांक 7 मार राजा ' तथागत ' गेली कित्येक वर्ष तपश्चर्या करीत असल्याने काळजीत होता. अग्नी, वर्षा यांचा मारा करूनही तसूभर फरक पडत नव्हता. सर्व उपाय संपल्यावर शेवटी मार कन्या यांनी वडिलांची विवंचना जाणली आणि आम्ही हे तपोभांग करू. असा निर्धार करून त्या जंगलाकडे निघाल्या. पुरुषी स्वभावाची चांगलीच ओळख त्यांना होती. पण तथागत ओळखणे हे सहज सुलभ नव्हते आणि नाहीही. त्यातील एक नृतिका तथागताच्या समोर आपले कौशल्य पणाला लावू लागली. बाकीच्या सहा जनी विविध वाद्य वाजवून साथ द्यायला लागली. परंतु हा प्रयोगही कुचकामी ठरला.  मित्र-मैत्रिणींनो, ही नर्तिका अंगठ्यावर नृत्य करायची. अगदी ती अंगठ्यावर उभे राहण्याच्या तयारी असलेली कोरण्यात कलाकाराचे कसब पाहण्यासारखे आहे. ज्या पायावर जोर किंवा दबाव जास्त आहे. त्या मांडीची रचना आणि जो पाय तितका घेऊन अंगठ्यावर उभारण्याच्या तयारीत आहे. त्या पायाची मांडी थोडी विस्तृत झालेली दाखवि...

आलिंगन - अद्वैताचे पहिले प्रतीक

Image
आलिंगन या शब्दाला गळाभेट किंवा ऊरभेट असेही म्हणतात. अलिंगनाला अद्वैताचे पहिले प्रतीक मानण्याचे कारण म्हणजे कामशास्त्रानुसार दोन जीवांचे परस्पर मिलन यास आलिंगन असे म्हटले आहे. या दोघांच्या भेटीत जी ओढ, व्याकुळता आणि प्रेमभाव प्रकट करण्याची क्षमता आहे; ती पाहता हे दोन्ही जीव एकरूप झालेले असतात. म्हणूनच त्यास अद्वैत असे म्हटले तरी चालेल अमीर खुसरो या उर्दू कवीने म्हटले आहे... मन तू शुधम तू मन शुधी  तन मन शुधम जू जॉ शुधी ता कस न गोयद बादअजी मन दिग्रम तू दिग्री याचा अर्थ मी तू झालो, तू मी झालीस. आता कोणीही असं म्हणू शकणार नाही की, तू आणि मी वेगवेगळे आहोत. यातील तनाची आणि मनाची एकरूपता स्पष्ट होते. हे जरी खरे असले तरी, सामान्यपणे आलिंगन म्हणजे भेट एवढाच अर्थ आपण घेतो. पण कामशास्त्रज्ञांनी यातही अनेक भेद दिलेले आहेत. आलिंगना संदर्भात एका कवीने म्हटले आहे. मिठी या शब्दात एवढा मिठास आहे नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे. असेच एक आलिंगन शिल्प वेरूळच्या कैलास लेणीमध्ये प्रदक्षिणा पथावर पाहण्यास मिळते. यामध्ये अभिसारिका नाईकेचे हे शिल्प कोरलेले असून, ती नुकतीच साज शृंगार करून घरातू...