चुंबन: प्राचीन भारतीय श्रृंगाराविष्कार
"प्रेमाची सुरुवात ही ओठांपासून होते." अगदी काही मिनिटे पूर्वी जन्मलेल्या बाळाचे ही प्रेमपूर्वक चुंबन घेतले जाते. प्रेम व्यक्त करण्याचे एक सहज सुलभ मार्ग म्हणजे चुंबन होय. मग ते आई-मुलांचे, वडील-मुलांचे, आजी-नातवाचे किंवा भावा-बहिणी सोबत, पती-पत्नी वा प्रियकर- प्रेयसी असो; जिथे निशब्द प्रेम व्यक्त करायचे असते. तिथे चुंबन हे एकमेव मार्ग आहे. ओठ हे शरीरातील सर्वात संवेदनशील अंग आहे. याच्या उपयोगाने आणि कामशास्त्राच्या अनुषंगाने विचार केल्यास 'चुंबन' हे नायक-नायिकेचा कामभाव जागृत करण्याचे साधन असून, प्रेम प्रदर्शनाचे निमित्त होय. याचा प्रयोग करतांना एकमेकांच्या मनोवृत्तीचा विचार करुनच केला पाहिजे. चुंबनाच्या अनेक प्रकारा पैकी काळाचे वेळेचे भान ठेवूनच त्यांचा प्रयोग केला पाहिजे, असे शास्त्र सांगते. चुंबन हे नायक / नायिकेच्या कोणत्या अंगाचे घेतले पाहिजे हे एकमेकांची आवड व स्वभाव लक्षात घेऊनच झाले पाहिजे. या संदर्भात शास्त्रानेही काही मार्गदर्शन केले आहे. या व्यतिरिक्त ज्यांना त्यांना जे आवडेल त्याचा स्विकार करावा. शास्त्र म्हणून विवेचन करतांना गृहय-अगृहय सर्व प्...