Posts

शिकलेली असहाय्यता आणि गुरू पौर्णिमा

Image
गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! "असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मा अमृतं गमय॥" — बृहदारण्यक उपनिषद "असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणि नश्वरतेकडून अमरत्वाकडे ने." भारतीय संस्कृतीत गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारे गुरुतत्त्व आहे.  जीवनात अनेकदा असे क्षण येतात की आपण वारंवार बोलतो, प्रयत्न करतो; पण आपले ऐकले जात नाही. अशा वेळी फक्त समस्या वाढत नाहीत, तर मनातील आशाही हळूहळू मावळू लागते. मानसशास्त्रात यालाच "शिकलेली असहाय्यता (Learned Helplessness)" असे म्हणतात. मानसशास्त्रज्ञ Martin Seligman यांनी स्पष्ट केलेली ही संकल्पना सांगते की, सततचे अपयश, अन्याय किंवा नकार यामुळे माणूस "मी काहीही केले तरी काही बदलणार नाही" असा समज करून घेतो आणि प्रयत्न करणेच सोडून देतो. परंतु भारतीय ज्ञानपरंपरा आपल्याला निराशेच्या गर्तेत अडकून राहायला शिकवत नाही.  उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥  - गीता ६.५ माणसाने स्वतःच्या ...

कर्पूरमंजिरी

Image
कर्पूरमंजिरी ... अशीच रोज नाहुनी लपेट ऊन कोवळे, असेच चिंब केस तू,  उन्हात सोड मोकळे; नुकतीच स्नान करून आलेली ही नायिका आपले ओले चिंब केस उन्हात सुकवत उभी आहे. तिच्या ओल्या केसांतून गळणारे पाण्याचे थेंब मोती समजून खाली असलेला चातक पक्षी ते पिण्यासाठी चोच उघडून उभा आहे, हा तपशील किती विलोभनीय आहे! कवी सुरेश भटांनी लिहिलेल्या ओळी जणू शतकांपूर्वीच्या या पाषाणशिल्पाला पाहूनच सुचल्या असाव्यात, इतका सुंदर हा मेळ जमून आला आहे. मूळ मूर्ती भंगलेली असून आधुनिक तंत्रज्ञानाने पूर्ण केली आहे.

मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा

Image
मातृत्व ही केवळ निसर्गाची देणगी नसून ती सृष्टीतील सर्वात कोमल, पवित्र आणि निःस्वार्थ भावना आहे. आईच्या कुशीतूनच माणूस प्रथम प्रेम, सुरक्षितता आणि जिव्हाळा अनुभवतो. म्हणूनच भारतीय शिल्पकलेत मातृभावाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. धारासूर येथील गुप्तेश्वर शिव मंदिर येथे कोरलेले हे “मातृशिल्प” त्या वात्सल्यभावनेचे अत्यंत जिवंत आणि दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. दगडामध्ये साकारलेले हे शिल्प पाहताना कलाकाराने केवळ शरीर कोरले नाही, तर भावनांनाही श्वास दिला आहे, याची प्रचिती येते. या शिल्पात माता आपल्या बालकाला प्रेमाने कुशीत घेत आहे. तिच्या हातातील अलगद स्पर्श, बाळाला धरून ठेवण्याची सुरक्षितता आणि चेहऱ्यावर उमटलेला वात्सल्यपूर्ण भाव अत्यंत प्रभावी आहे. परंतु या शिल्पातील सर्वात विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे माता बाळाच्या ओठांचे चुंबन घेताना दाखवलेली आहे. भारतीय मंदिरशिल्प परंपरेत माता-बालक दृश्ये अनेक ठिकाणी दिसतात, परंतु अशा प्रकारचा “लिप-किस” अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे हे शिल्प केवळ कलात्मक नसून भावविश्वाच्या अभिव्यक्तीचेही अद्वितीय उदाहरण ठरते. या दृश्यात...

" वो बुलाती हैं मगर जानेका नहीं "

Image
“वो बुलाती हैं मगर जाने का नहीं...” कधीतरी ऐकलेली ही ओळ आज अक्षरशः जगलो. माणकेश्वरकडे निघालो होतो. वाटेत धर्मापुरी आली, पण ठरले होते, थांबायचे नाही. वेळ वाया जाऊ नये, कारण हे मंदिर आधीच पाहिलेले. परंतु मनाच्या खोलवर कुठेतरी त्या मंदिरावरील पत्र लेखिका नायिका पुन्हा एकदा आपल्याला हाक मारत होती. तिच्या शिल्पातील माधुर्य, तिचा आत्मीय भाव, सर्व काही मनात कोरलेलेच होते. देशभरातील असंख्य शिल्पे पाहिली, पण धर्मापुरीतील ती नायिका मात्र अविस्मरणीय. तिचा कमनीय बांधा, त्रिभंगातील सहजता, पाठीवरील पन्हाळाचे सौंदर्य, उन्नत स्तनमंडळ आणि पृथुल नितंब —  जणू शिल्पकाराने दगडाला नव्हे तर श्वासालाच आकार दिला आहे. तिचे केस — हलक्या वळणांचा मनमोहक बुचडा, ज्यातून काही बटा कपाळावर नाचत होत्या. गळ्यात माळांचे सौंदर्य, कमरेभोवती वलय घालणारी मेखला,  गळ्यातून ओघळत कमरेवर विसावणारी सोनसाखळी जणू प्रकाशरेषा तिच्या देहावरून झेपावत होत्या.  हातातील कडे तिच्या लेखणीच्या हालचालीत लय निर्माण करीत होते,  तर पायातील पैंजण आणि पादजालक तिच्या ठेक्याचा सुर ऐकवत होते. ही नायिका म्हणजे लावण्य आणि ल...

🌼 आज भाईदूज अर्थात यमद्वितीया 🌼

Image
पौराणिक कथानुसार, कई दिनों के इंतज़ार के बाद आज के दिन यमराज अपनी बहन यमी (यमुना) के घर मिलने गए थे। कहा जाता है कि यमुना ने अपने भाई का अत्यंत सत्कार किया, आरती उतारी और उसके दीर्घायु होने की प्रार्थना की। इसी प्रसंग से इस दिन का महत्व बढ़ा और यह पर्व भाईदूज के रूप में मनाया जाने लगा। इसके अतिरिक्त, इस दिन से जुड़ी एक और कथा श्रीकृष्ण और सुभद्रा की भी मानी जाती है — नरकासुर का वध करके जब श्रीकृष्ण द्वारका लौटे, तो सुभद्रा ने आरती उतारकर उनका स्वागत किया। भाई-बहन के इसी स्नेहभाव से भाईदूज की परंपरा प्रचलित हुई। पौराणिक कथाएँ प्रतीकात्मक अवश्य हैं, पर एक बात निश्चित है — 👉 धर्म कला के माध्यम से फला-फूला, और कला धर्म के आधार पर विकसित हुई। आज यमद्वितीया के अवसर पर मैं यमराज की एक मूर्ति (शिल्प) साझा कर रहा हूँ, क्योंकि — > 🔱 यह एकमात्र ऐसे देवता हैं जिनकी पूजा-अर्चना करो या न करो — एक दिन तो वे मिलने ज़रूर आएँगे! 😛😆😆😆 पुनश्च: शिल्प शुभकामनाएँ! 🎉 डॉ. अरविंद सोनटक्के मूर्तिशास्त्र अध्ययनकर्ता भोकर (नांदेड़)

पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.

Image
उजनीच्या अथांग जलाशयाखाली एक अमूल्य रत्न दडलेले आहे… पलसदेवचे विष्णु मंदिर!  येथे केवळ शिल्पकला नाही, तर रामायणाच्या कथा दगडांमध्ये जिवंत झालेल्या दिसतात. उजनी धरणाच्या जलाशयाच्या मध्यभागी दडलेले पलसदेवचे शिव मंदिर आहे. त्याच्या बाजूला थोड्या उंचीवर एक मंदिर दृष्टीस पडते. पावसाळ्यानंतर इथे सहज जाता येते. परंतु पसळदेव हे शिव मंदिर पाहण्यासाठी उन्हाळ्यात पाणी पातळी खाली गेल्याशिवाय जाणे शक्य नाही. किनाऱ्यावरील ज्या मंदिरास विष्णु मंदिर (?) म्हणून ओळखले जाते ते मंदिर इतिहास, शिल्पकला आणि अध्यात्म यांचे अद्भुत संमेलन असून हे मंदिर द्विदल आहे. या मंदिराची मांडणी उंच जगती / जोत्यावर आहे. सभामंडप, मुखमंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले हे मंदिर प्राचीन कारागिरीचे जिवंत उदाहरण आहे. मंदिरातील उपगर्भगृह दक्षिणाभिमुख असून ते भैरवाला समर्पित असावे, असे संशोधकांचे मत आहे. येथे भैरवाची एक प्रतिमा दिसून येते. चार स्तंभांवर आधारलेला सभामंडप व रिकामे देवकोष्ठ या वास्तूशैलीला अधिक गंभीर बनवता. मंदिराच्या दाराशी उभे राहिले तरी त्याचे प्राचीन वैभव स्पष्ट दिसते. पर्यटनाच्या दृष्टीने हे म...

शिव पार्वती - भारतीय पौराणिक कथेतील पहिले वैवाहिक जोडपे

Image
प्रस्तुत मूर्ती ही वेरूळ लेणी मधील असून कल्याण सुंदर या नावाने ओळखली जाते. शिवासोबत विवाह करण्यासाठी पार्वती तपश्चर्या करते आणि शिवास विवाहा साठी तयार करते. असे असेल तरी शिव हा पार्वतीसह विवाह करण्यास तितकाच अतुर असल्याचे कलाकाराने मानवी भावना देवतेशी जोडून हे शिल्प कोरलेले आहे.  लग्न वेदीवर एकटी नववधू सर्व पुरुष मंडळीच्या मध्ये उभी असल्याने तसेच शिवाने सर्वांसमक्ष तिच्या खांद्यावर हात ठेवल्याने पार्वती खूप लाजली आहे. त्या मुळे तिच्या पाठीला हलकासा बाक आलेला असून अशक्य असलेल्या विवाहाचे स्वप्न पूर्ण झाल्याने पार्वतीने विवाह मंडपी येण्यासाठी जी गडबड किंवा तिची उडालेली धांदल दाखविण्यासाठी तिने एकाच पायात पैंजण घातले असून दुसऱ्या पायात पैंजण घालायची विसरली आहे, असे कलाकाराने दाखविले आहे. अजून या मूर्ती मधील गंमत म्हणजे विवाह समयी वधूने वराच्या हाती आपला हात द्यायचा असतो. इथे मात्र शिव ही पार्वती सोबत विवाह करण्यास एव्हढा उत्सुक झाला आहे की, पार्वतीचा हात आपल्या हाती घेण्याऐवजी आपलाच हात पार्वतीच्या हातात दिलेला आहे. या विवाह समयी प्रत्यक्ष ब्रह्म देव पौरोहित्य करण्यास बसलेले आहेत. आज ...