पाल शिल्प कलेतील मातृ भावना...
पाल कालखंडात दहाव्या शतकात निर्माण झालेली साधारणतः लांबी 35" (89 सेमी) असलेली ही मूर्ती आहे. एका ऋषीची पत्नी सुचिस्मती हिला स्वतः शिवासारखा मुलगा हवा होता. तिची इच्छा लक्षात घेऊन तिच्या पतीने वाराणसी (बनारस) येथे एका लिंगाची पूजा केली आणि शिवाने स्वत:ला सुचिस्मतीचा मुलगा म्हणून जन्म घेतला, ज्याचे नाव गृहपती होते. ऋषी पत्नीच्या इच्छेसाठी, शिवाने हे नाव आणि रूप धारण केले, तर गृहापती हे नाव अग्निशी संबंधित असून शिव व अग्नी यांचा सहसंबंध ही पौराणिक कथेत सापडतो. ही आख्यायिका पाल राजवंशात शिल्पांमध्ये वारंवार दर्शविली जाते, ज्यामध्ये आई आणि मूल एका भव्य पलंगावर झोपलेले दर्शवितात. शिल्पपटाच्या मध्यभागी आई आणि मुल दाखविले जाते. प्रस्तुत शिल्पात सुचिस्मतीच्या पायाची मालिश करणारी एक महिला परिचारक कोरलेली असते; तर दुसरी हाती पंखा घेतलेली परिचारिका ही डोक्याजवळ असते. शिल्पाच्या वरील बाजूस लिंग आणि कमलस्थित गणेश असतो. त्या सोबतच नऊ ग्रह कोरलेले असतात. खालील बाजूस म्हणजे पलंगाच्या समोर, उपासकांच्या लघु आकृती आणि विविध धार्मिक वस्तू दाखवतात. आई सुंदर पोशाख घातलेली असून तिचे खांदे आण...