Posts

Showing posts from February, 2022

सहल चारठाणा

Image
चारठाना, ता. जिंतूर जिल्हा परभणी. गाव तसे लहानच पण कुणी विश्वास करेल का?  एकेकाळी हे लहानसे गाव एक वैभव संपन्न शहर होते. गावात चार मंदिरे, एक बारव आणि एक भव्य असे जैन मंदिर होते. आजमितीस या जैन मंदिराचे कोणतेही स्थापत्य शिल्लक नसले तरी, जैन मानस्तंभ अजूनही आपले अस्तित्व टिकून काळाच्या ओघात संघर्ष करत उभा आहे. हा जैन मानस्तंभ 33 फूट 3 इंच उंचीचा असून त्यावरील जैन यक्षिनी अजूनही कला सौंदर्याच्या बाबतीत सरस अशा असलेल्या पाहावयास मिळतात. गावातील गणेश मंदिर आणि शिवमंदिरे अप्रतिम आहेत. मनाला भुरळ घालणारी बारव प्राचीन काळामध्ये आपल्याला घेऊन जाण्यास नक्कीच सक्षम आहे. विशेष म्हणजे गावचा गावगाडा चारठाणा या ठिकाणी मला पाहायला मिळाला. "कोण पाहुणे आले." असं सर्वजण आस्थेने चौकशी करत होते. गावातील 'अतृप्त आत्मा मित्रमंडळ' गटातील सदस्य पार्टीला या असे आवर्जून सांगत होते. ही पार्टी म्हणजे ओली पार्टी नाही बरे का, तर अगदी मराठमोळी कार्यक्रम, सगळे एकत्र येऊन ही शुद्ध शाकाहारी पार्टी करतात. माझे मित्र श्री लक्ष्मीकांत जी सोनवटकर यांचा पाहुणचार लक्षात राहण्याजोगा आहे. कला अभ्य...