Posts

Showing posts from August, 2021

कृष्ण

Image
  तू फसवलंस मला.... सतत स्वतः राधा असल्याचा विभ्रम निर्माण करत राहिलीस मी बासरी आणि मोरपीस घेऊन  स्वतःला कान्हा समजत बागडत राहिलो गोकूळभर.... आणि एके दिवशी   नकळत द्वारकेला निघून गेलीस स्वतःच कृष्ण होऊन.... मी शोधत राहिलो तुला  यमुनेच्या काठावर   वेड लागल्यागत राधा होऊन.... खरंतर प्रत्येक कहाणी संपल्यावरच  ठरवलं गेलं पाहिजे  कोण कृष्ण होता  आणि कोण राधा.... स्त्रीचं नाव कृष्ण  आणि पुरुषाचं नाव राधा असायला काय हरकत आहे ? पण तू खरंच फसवलंस मला  कान्हा बनवून.... - आनंद पेंढारकर कृष्ण : ज्यांना जसा हवा तसा आवडला... कुणाला बाललीला भावल्या, तर कुणाला प्रेमी असलेला तरुण कृष्ण, कुणाला भगवतगीता सांगणारा प्रौढ कृष्ण... समग्र कृष्ण कुणी जाणून घेतलाच नाही... ग्राउंड लेव्हलला असणारा... वास्तववादी... इंद्राचा विरोध करणारा... हंडी फोडणारा... तरुणीचे कपडे चोरणारा... कालिया, कंस मारणारा... पुन्हा कायम रनछोडदास...खांडव वनातून पळवून लावणारा... द्रौपदीस वस्त्र देणारा...रन भूमीवर नैतिकतेत न अडकता आताच कर्णाला मारता येतो म्हणणारा... 'अपादधर्म' सांगू...

'शोध - शीतला देवीचा'

Image
आज शीतला सप्तमी निमित्ताने..... ठिकाण - मुखेड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर वसलेले तालुक्याचे गाव. स्थळ - दशरथेश्वेर मंदिर, मुखेड. माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते. जगातील प्राचीन उपासनेत शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. मानवी जीवनात स्त्रीचे असलेले महत्त्व याचे मुख्य कारण असू शकते. मातेच्या रूपात प्रजनन आणि संगोपन या दोन्ही गोष्टी स्त्रीकडे असल्यामुळे मातृ उपासना जगामध्ये सुरू झाली असावी. भारतात आणि भारताबाहेर कित्येक ठिकाणी मातृ देवतेच्या मूर्ती आढळून येतात. बलुचिस्थान, इराण, मेसोपोटेमिया, तुर्कस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त येथेही स्त्री अथवा मातृ देवतेच्या मूर्ती आढळून आलेले आहेत. निरनिराळ्या मूर्तीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, शक्तीची उपासना तीन प्रकारे केल्या जाते. एक म्हणजे दिगंबर रूपा मध्ये, दुसरे रूप म्हणजे लहान मुलासह आणि तिसरा भाग म्हणजे दिग्वसना स्त्री दाखवितात पण मुखाच्या ठिकाणी कमलासारखी फुले, पशु क...

नाग पंचमी - कला आणि सांस्कृतिक संदर्भ

Image
भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका सपाट शिळेवर वळसे दार शरीर असलेल्या नागांचे शिल्प हमखास असतेच. त्यावर कधी हळद, कुंकू तर कधी शेंदूर लावलेले दिसते. काही ठिकाणी 'नाग युगल' एकमेकांना वेटोळे घातलेली शिल्पे पाहावयास मिळतात. नागांशी संबंधित असंख्य कथा या देशात अस्तित्वात आहेत. आदिवासी, अवैदिक, वैदिक समाजात वेगवेगळ्या कथांची गुंफण असून अशा कथातून भारतीय संस्कृती भक्कमपणे उभी आहे. नागाशी संबंधित असलेले अनेक शिल्पे असून सूर्य व नागाचे अनन्य संबंध सर्वश्रुत आहेतच. लोकजीवनातील नागांच्या महात्म्या मुळेच हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये ही उपदेवतेच्या रुपाने नागांना मान्यता मिळालेली दिसते. विविध धर्मातील प्रमुख देवते सोबत त्यांचा संबंध जोडलेला दिसून येतो. असे मानले जाते की नागांची उत्पत्ति श्रावण ...