कृष्ण

 


तू फसवलंस मला....


सतत स्वतः राधा असल्याचा

विभ्रम निर्माण करत राहिलीस

मी बासरी आणि मोरपीस घेऊन 

स्वतःला कान्हा समजत

बागडत राहिलो गोकूळभर....


आणि एके दिवशी  

नकळत द्वारकेला निघून गेलीस

स्वतःच कृष्ण होऊन....

मी शोधत राहिलो तुला 

यमुनेच्या काठावर  

वेड लागल्यागत राधा होऊन....


खरंतर प्रत्येक कहाणी संपल्यावरच 

ठरवलं गेलं पाहिजे 

कोण कृष्ण होता 

आणि कोण राधा....


स्त्रीचं नाव कृष्ण 

आणि पुरुषाचं नाव राधा असायला

काय हरकत आहे ?


पण तू खरंच फसवलंस मला 

कान्हा बनवून....


- आनंद पेंढारकर



कृष्ण : ज्यांना जसा हवा तसा आवडला...

कुणाला बाललीला भावल्या, तर कुणाला प्रेमी असलेला तरुण कृष्ण, कुणाला भगवतगीता सांगणारा प्रौढ कृष्ण...


समग्र कृष्ण कुणी जाणून घेतलाच नाही...


ग्राउंड लेव्हलला असणारा... वास्तववादी... इंद्राचा विरोध करणारा... हंडी फोडणारा... तरुणीचे कपडे चोरणारा... कालिया, कंस मारणारा... पुन्हा कायम रनछोडदास...खांडव वनातून पळवून लावणारा... द्रौपदीस वस्त्र देणारा...रन भूमीवर नैतिकतेत न अडकता आताच कर्णाला मारता येतो म्हणणारा... 'अपादधर्म' सांगून "नरो वा कुंजरो." म्हणायला भाग पडणारा...अजून बराच काही... 😊

Comments

Popular posts from this blog

पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.

मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा

चुंबन: प्राचीन भारतीय श्रृंगाराविष्कार