कृष्ण - केवळ नाव नाही तर संपूर्ण जीवन दर्शन आहे.
कृष्ण : काळानुरूप जगणारे, जमिनीवरचे व्यक्तिमत्त्व! कृष्ण हे केवळ एक नाव नाही; ते अनेक अर्थांनी समृद्ध असलेले व्यक्तिमत्त्व आहे. कृष्णाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, ज्या वयात जसे असायला हवे, तसेच कृष्ण आहे. म्हणूनच त्याचे व्यक्तिमत्त्व एका चौकटीत बांधता येत नाही. बालवयात तो लोणी चोरणारा नटखट गोपाळ आहे. तरुण वयात गोपिकांच्या खोड्या काढणारा, त्यांच्या वस्त्रहरणाच्या कथेतून तत्कालीन सामाजिक संकेतांना वेगळ्या पद्धतीने आव्हान देणारा आणि प्रौढ वयात तो भगवद्गीतेचा तत्त्वज्ञ होतो. रणभूमीवर कर्णाचा रथ चिखलात रुततो, तेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतो, हीच योग्य वेळ आहे. कारण कृष्णासाठी युद्धाच्या वास्तवापासून दूर राहून आदर्शवाद मांडणे महत्त्वाचे नाही; परिस्थितीचे भान ठेवून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कृष्ण म्हणजे ‘डाउन टू अर्थ’—जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे असलेले व्यक्तिमत्त्व आहे. प्रस्तुत शिल्पात दिसणारा गोवर्धनधारी कृष्ण याच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू आपल्यासमोर आणतो. इंद्राची पूजा करण्याची परंपरा असताना कृष्णाने प्रश्न उपस्थित केला की, आप...