गुड्डीमल्लमचे शिवलिंग
इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील ही मूर्ती असून पुरुष लिंग अकरातील देशातील पहिली मूर्ती आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही मूर्ती आहे. लिंगाच्या समोर एक व्यक्ती उजव्या हातात शिंग असलेला प्राणी धरलेला असून डाव्या हातात कुंभ आणि परशु घरलेला आहे. मूर्ती पाच फूट उंचीची असून स्थान महात्म्य नुसार परशु रामाने आई रेणुकेला मारल्या नंतर तो प्रायश्चित करण्यासाठी तिथे गेला होता. प्रायश्चित करीत असताना परशुराम रोज एक दैवी फुल शिवलिंगावर अर्पण करीत असे. या दैवी फुलाचे रक्षण करण्यासाठी चित्रसेन नावाचा यक्ष सोबत ठेवलेला होता. या यक्षास रोज एक प्राणी आणि भांडे भर ताडी द्यावयाचे कबूल करण्यात आले होते. कारण रोज एकच दैवी फुल उगवत असे. ते फूल परशुराम लिंगावर अर्पण करीत असे. एक दिवस यक्ष चित्रसेनलाही भक्ती करावीशी वाटली. ते दैवी फुल त्याने शिवाला अर्पण केल्याने दोघात घनघोर युद्ध झाले. शेवटी शिव प्रसन्न होऊन दोघांनाही आपल्यात सामावून घेतले. स्थानिक भाषेमध्ये पल्लव म्हणजे युद्धभूमी तर गुड्डी म्हणजे मंदिर होय. या प्रदेशावर पल्लव, गंगपल्लव, बना, चोल यांच्या राजवटी होत्या. मंदिराच्या बाह्य अंगावर यासंदर्भात ...