नवदुर्गा - प्रतिमा शास्त्रीय लक्षण
पट्टदकल येथील मंदिराच्या गर्भगृहात असलेली महिषासुर मर्दिनी कलेच्या क्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तीची निर्मिती कधी पासून प्रारंभ झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणतः शुंग कालपासून पाषाण निर्मित दुर्गा देवी पहावयास मिळते. असे काही अभ्यासक मानतात. कारण या पाषाण शिल्पात सिंह ही काही ठिकाणी कोरलेला आढळून आला आहे. गुप्त काळात दुर्गा देवीची अशी अनेक शिल्प आहेत. ज्या मध्ये स्कंद कार्तिकेय देवीच्या मांडीवर बसलेला कोरलेला आहे. गुप्त काळानंतर सिंह वहिनी दुर्गा प्रतिमा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दिसतात. देवी महात्म्य, मत्स्यपुराण, रूपमंडन या ग्रंथात देवीस कात्यायनी म्हटलेले आहे. निरनिराळी रूपें घेऊन आदिशक्तीने चण्ड, मुण्ड, शुंभ, निशुंभ, वगैरे राक्षसाचा संहार केला. त्यात महिषासुरांचा संहार करणारी जी देवी तिला दुर्गा असें म्हणतात. रंभ नावाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा महिषासुर याने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या इच्छेप्रमाणें त्याला अमरत्व तर मिळाले नाही पण एवढी सूट मिळाली की, त्याचे मरण स्त्री शिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. स...