कर्पूरमंजिरी


कर्पूरमंजिरी ...

अशीच रोज नाहुनी
लपेट ऊन कोवळे,
असेच चिंब केस तू, 
उन्हात सोड मोकळे;

नुकतीच स्नान करून आलेली ही नायिका आपले ओले चिंब केस उन्हात सुकवत उभी आहे. तिच्या ओल्या केसांतून गळणारे पाण्याचे थेंब मोती समजून खाली असलेला चातक पक्षी ते पिण्यासाठी चोच उघडून उभा आहे, हा तपशील किती विलोभनीय आहे!
कवी सुरेश भटांनी लिहिलेल्या ओळी जणू शतकांपूर्वीच्या या पाषाणशिल्पाला पाहूनच सुचल्या असाव्यात, इतका सुंदर हा मेळ जमून आला आहे.

मूळ मूर्ती भंगलेली असून आधुनिक तंत्रज्ञानाने पूर्ण केली आहे.

Comments

Popular posts from this blog

पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.

मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा

चुंबन: प्राचीन भारतीय श्रृंगाराविष्कार