सफर औरंगाबाद लेणीची...
ना होकर भी तुम मौजूद हो मुझमें,
क्या खूब तुम्हारा वजूद है मुझमें।
इस तरह हम सुकून को महफूज कर लेते हैं,
जब भी तन्हा होते हैं तुम्हे महसूस कर लेते हैं।
औरंगाबाद लेणी
लेणी क्रमांक 7
मार राजा ' तथागत ' गेली कित्येक वर्ष तपश्चर्या करीत असल्याने काळजीत होता. अग्नी, वर्षा यांचा मारा करूनही तसूभर फरक पडत नव्हता. सर्व उपाय संपल्यावर शेवटी मार कन्या यांनी वडिलांची विवंचना जाणली आणि आम्ही हे तपोभांग करू. असा निर्धार करून त्या जंगलाकडे निघाल्या. पुरुषी स्वभावाची चांगलीच ओळख त्यांना होती. पण तथागत ओळखणे हे सहज सुलभ नव्हते आणि नाहीही. त्यातील एक नृतिका तथागताच्या समोर आपले कौशल्य पणाला लावू लागली. बाकीच्या सहा जनी विविध वाद्य वाजवून साथ द्यायला लागली. परंतु हा प्रयोगही कुचकामी ठरला.
मित्र-मैत्रिणींनो,
ही नर्तिका अंगठ्यावर नृत्य करायची. अगदी ती अंगठ्यावर उभे राहण्याच्या तयारी असलेली कोरण्यात कलाकाराचे कसब पाहण्यासारखे आहे. ज्या पायावर जोर किंवा दबाव जास्त आहे. त्या मांडीची रचना आणि जो पाय तितका घेऊन अंगठ्यावर उभारण्याच्या तयारीत आहे. त्या पायाची मांडी थोडी विस्तृत झालेली दाखविण्यात कलाकार यशस्वी झालेला आहे. वाद्य वाजविणाऱ्या मुली यांच्या जवळ असलेली बासरी, टाळ, मृदंग हे सर्व पाहता. यांच्यातील कला नैपुण्य डोळ्यात साठवणे हा अनुभव काही वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा असतो. समोरील पॅनल वर मार राजा पत्नीसह असून दोघांच्या मध्ये तथागताची भव्य मूर्ती आहे. महत्वाचे म्हणजे अजिंठा ते वेरूळ या शिल्प निर्मितीत व्हाया औरंगाबाद लेणी असा प्रवास आहे. त्या मुळे औरंगाबाद लेणी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे औरंगाबाद मध्ये वास्तव्य करून असणाऱ्या कित्येक स्थानिक लोकांना ही लेणी अद्याप माहिती नाही. मी जेव्हा या बद्दल बोलतो तेव्हा मला म्हणतात, ती लेणी आम्हाला दाखवाल का. एव्हढेच नसून विदेशातून येणारे पर्यटक गाईडला जेव्हा वेरूळ - अजिंठा पाहून झाल्यावर ती मार कन्या कुठे आहे. असे विचारतात तेव्हा आश्चर्याने गाईड त्यांच्याकडे पहात विचारतो की, हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा विदेशी पर्यटक म्हणतात, आम्ही हे सर्व वाचून आलो आहोत. फक्त आपण ती मूर्ती कधी दाखवणार याची वाट पाहत होतो. खरच सांगतो आपल्या एव्हढे करंटे आपणच आहोत...
बहुत काय लिहणे...
दीपावली सुट्टीत कुठे फिरण्याचा मानस असेल तर...
चला औरंगाबादला...
आधी मराठवाडा तर नीट पाहून घ्या...
संत, तंत आणि पंत सर्व आमच्याकडे आहे...
आणि हो...
ही आणि असे कित्येक शिल्प आहेत...
कित्येक मूर्ती शिल्प इतिहासाचे मुक साक्षीदार होऊन आपली वाट पहात आहेत...
भूतकाळ आणि भविष्यकाळातील हा मुक संवाद संपण्यापूर्वी...
एकदा तरी पाहायलाच हवे...
हवे तर आपण ठरवून जाऊन येऊ... ☺️
मला तर फार आठवण येत आहे...😔
Comments
Post a Comment