शिव पार्वती - भारतीय पौराणिक कथेतील पहिले वैवाहिक जोडपे


प्रस्तुत मूर्ती ही वेरूळ लेणी मधील असून कल्याण सुंदर या नावाने ओळखली जाते. शिवासोबत विवाह करण्यासाठी पार्वती तपश्चर्या करते आणि शिवास विवाहा साठी तयार करते. असे असेल तरी शिव हा पार्वतीसह विवाह करण्यास तितकाच अतुर असल्याचे कलाकाराने मानवी भावना देवतेशी जोडून हे शिल्प कोरलेले आहे. 

लग्न वेदीवर एकटी नववधू सर्व पुरुष मंडळीच्या मध्ये उभी असल्याने तसेच शिवाने सर्वांसमक्ष तिच्या खांद्यावर हात ठेवल्याने पार्वती खूप लाजली आहे. त्या मुळे तिच्या पाठीला हलकासा बाक आलेला असून अशक्य असलेल्या विवाहाचे स्वप्न पूर्ण झाल्याने पार्वतीने विवाह मंडपी येण्यासाठी जी गडबड किंवा तिची उडालेली धांदल दाखविण्यासाठी तिने एकाच पायात पैंजण घातले असून दुसऱ्या पायात पैंजण घालायची विसरली आहे, असे कलाकाराने दाखविले आहे.

अजून या मूर्ती मधील गंमत म्हणजे विवाह समयी वधूने वराच्या हाती आपला हात द्यायचा असतो. इथे मात्र शिव ही पार्वती सोबत विवाह करण्यास एव्हढा उत्सुक झाला आहे की, पार्वतीचा हात आपल्या हाती घेण्याऐवजी आपलाच हात पार्वतीच्या हातात दिलेला आहे. या विवाह समयी प्रत्यक्ष ब्रह्म देव पौरोहित्य करण्यास बसलेले आहेत.

आज महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...💞

मूर्ती स्थळ - उमा महेश्वर, येरगी ता. देगलूर जि नांदेड
फोटो सौजन्य - 
श्री मकरंद दिवाकर
नायब तहसीलदार, नांदेड

Comments

  1. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसदेवाचे विष्णू (?) मंदिर - उजनीच्या पाण्यात दडलेले रामायण शिल्प वैभव.

मातृदिनाच्या निमित्याने शिल्प शुभेच्छा

चुंबन: प्राचीन भारतीय श्रृंगाराविष्कार